काल बुधवार (दिनांक १० जून २०२३) या दिवसाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष हे लागले होते. आणि अखेर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल या निकालाचं वाचन केलं. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असणारा गटच खरा शिवसेना पक्ष आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरवले. हा निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी या घडल्या आहेत आणि त्याच सोबत अनेक बनेत्यांनी या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया देखील दिली आहे. अश्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरेंना टोला लगावला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते. त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात म्हटले आहे. सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, ‘सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही! सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणारच’, असं असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. आज विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला. त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिला.
“मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. ” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे. आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
