देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सागरी सेतूचे उद्घाटन करणार आहे. जगातील सर्वात मोठा सागरी सेतू हा आहे. सागरी सेतूवर ताशी 100 किमी वेगाने वाहने धावणार आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबी हा दोन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार आहे. शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत.
मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला आता ‘अटल बिहारी वाजपेयी सेवारी-न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती. आज त्याचे उद्घाटनही ते करणार आहेत. अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे.
हा पूल 21.8 किमी लांबीचा आणि 6 लेनचा आहे. 16.5 किमी लांबीचा मार्ग समुद्रावर बांधला आहे तर सुमारे 5.5 किमी जमिनीवर बांधला आहे. हा देशातील सर्वात लांब पूल आहे. हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. त्यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील संपर्क सुधारेल. आजपासून अटल सेतू सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. चालकांना अटल सेतूवर ताशी 100 किमी वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल. सागरी सेतूवरून अवजड वाहने, दुचाकी, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर यांना परवानगी दिली जाणार नाही.
या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ सध्याच्या २ तासांवरून कमी होणार असल्याचे समजतेय. 2018 पासून या 18000 कोटी रुपयांच्या सेतूच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. नियोजनानुसार हे काम 4.5वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कोविड-19 महामारीमुळे पाहा प्रकल्प आठ महिन्यांनी लांबणीवर पडला होता.
अटल सागरी सेतूवर दिवसाला 60 हजार वाहने धावतील, असा दावा केला जात आहे. 22 किलोमिटरचा हा सागरी सेतूमुळे रायगडात माणूस अर्धा तासांत मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईसाठी हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. सागरी सेतू तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामुळे वाहन क्षमता अधिक असणार आहे. या प्रकल्पाच स्टिलचा अधिक वापर केला गेला आहे.
अटल सेतू बनविणे अतिशय आव्हानात्मक काम होते. यासाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून हा अद्वितीय पूल बांधण्यात आला. एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण असलेल्या मुंबई खाडीमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. कंटेनर वाहून नेणारी मोठी जहाजे तसेच मासेमारीच्या बोटी येथून सतत ये-जा करीत असतात. त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी याबरोबरच कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्राखालील वाहिन्या, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि बीपीसीएलच्या तेल टर्मिनल्सची सुरक्षितता आदी बाबी लक्षात घेऊन या व्ह्यू बॅरिअर्सचे नियोजन करण्यात आले आहे.
