ऑलिम्पिकमध्ये देशाला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव आणि स्मरण करून राज्यात विविध खेळाविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे. यासोबतच राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्य अग्रेसर बनावे, यासाठी क्रीडा विभागामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.पहिल्या राज्य क्रीडा दिनानिमित्त सोमवारी उदगीर येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव आणि मंत्री चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घानप्रसंगी मंत्री संजय बनसोडे बोलत होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, व्यंकटराव बेंद्रे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, पंडित धुमाळ, सिध्देश्वर पाटील, दत्ता पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शेख फैयाज, अहेमद सरोवर, शेख इफ्तेखार यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाने खेळाडूंसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. गत तीन वर्षांपासून रखडलेल्या शिवछत्रपती राज्य पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 3 लाख ऐवजी 5 लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना 1 लाख ऐवजी 3 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
उदगीरला खेळाची मोठी आणि खूप जुनी परंपरा असून ही परंपरा जोपासण्यासाठी उदगीर येथे राज्याच्या क्रीडा विभागामार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकताच राज्यस्तरीय युवा महोत्सव शहरात पार पडला. तसेच विविध क्रीडा स्पर्धाही झाल्या. आता लवकरच खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीरमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.उदगीरला खेळाची मोठी आणि खूप जुनी परंपरा असून ही परंपरा जोपासण्यासाठी उदगीर येथे राज्याच्या क्रीडा विभागामार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकताच राज्यस्तरीय युवा महोत्सव शहरात पार पडला. तसेच विविध क्रीडा स्पर्धाही झाल्या. आता लवकरच खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीरमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
