शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नुकताच विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना अशी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे गटाने घेतला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याचिका दाखल आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मशाल निवडणूक चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.
शिवसेना पक्ष हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाचे मशाल चिन्हही धोक्यात आले आहे. कारण, या चिन्हावर दावा करत समता पक्षाने पुन्हा एकदा आक्रमकाची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे गटारा निवडणूक आयोगाने दिलेले मशाल चिन्ह पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच या चिन्हासाठी ते निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे देखील सांगितले आहे.
मुख्य म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये समता पक्ष मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे मोठी माहिती मंडल यांनी दिली आहे. तसेच यावेळी जर आयोगाने आम्हाला दात दिली नाही तर आम्ही न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मंडल यांनी दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या अडचणीत आईन निवडणुकीच्या काळात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने सर्वच राष्ट्रीय पक्षांना चिन्हासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या ‘मशाल’ चिन्हाचा दावा करणार असल्याचे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे.
