पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मोदींच्या शुभहस्ते समृद्धी महामार्ग, अटल सेतू भुमिपुजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं, मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात आहे. घरं मिळालेल्या सर्व कामगारांचे अभिनंदन करतो. आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सोलापूरच्या पवित्र भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. मोदीजी म्हणाले होते शिलान्यास हमने किया है और उद्घाटन भी हम करेंगे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांचे उद्घाटन देखील मोदींनी केले होते. मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर वास्तवात होते. आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच दावोस दौऱ्यावरुन परत आले. यावेळी त्यांनी दावोस दौऱ्यातही मोदींचा जयजयकार असल्याचं गितलं. मी कालच डाओसवरून परतलो. डाओसमध्ये 3 लाख 53 हजार करोडच्या करारावर सह्या झाल्यात. मला तिथे अनेक जण भेटले. सर्वांच्या मुखी फक्त एकच नाव होतं मोदीजींचे. अनेक उद्योगपती तिथे आले होते. त्यांना गॅरंटी आहे मोदीजी पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करणार आहेत. आमच्या राज्यात देखील डबल इंजिन सरकार बनणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जगभरातून लोक दावोसमध्ये आले, कारण त्यांना गॅरंटी आहे की, देशात मोदी सरकार येणार आहे. तसेच महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार बनणार आहे, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, मी भूमिपूजन करत आहे आणि या घरांची चावी देण्यासाठीही मीच येईल. हीच मोदी गॅरंटी आहे. संत तुकाराम महाराज यांनी म्हटलं आहे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हा अभंग मोदींना तंतोतंत याठिकाणी लागू होतो आहे. मोदींची गॅरंटी ही कागदावर नसते तर वास्तवात उतरते.
