प्रगतीशील सरकारमुळे महाराष्ट्राचं नाव; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

राजकारण आरोप-प्रत्योरोप होत असतो. परंतु आमचा मार्ग विकास आहे. यामुळे देशातील चार कोटी लोकांना आम्ही पक्के घरे देऊ शकलो. या लोकांना किती आनंद झाला हे त्यांनाच विचारा. देशात दीर्घकाळपर्यंत गरीबी हाटव नारे लावले गेले. परंतु गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या. परंतु त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता. म्हणजे आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती. परंतु आता तुम्ही बघितलेले दिवस तुमच्या मुलांना बघायला मिळणार नाही. झोपडीऐवजी आता पक्के घरात तुम्हाला राहण्यास मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. ९० हजार घराचे लोकार्पण करण्यात आले. ३० हजार डेमो फ्लॅटची पाहणी करण्यात आली. तसेत १० लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. अमृत योजनेतून १७०० कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी केली.

लाखो रुपयांची ही घरे तुमची संपत्ती आहे. ज्या कुटुंबांना ही घरे मिळाली आहेत त्यांच्या अनेक पिढ्या बेघर राहिल्या आहेत. मला विश्वास आहे की या घरांसोबत तुमच्या मुलांना तुम्ही जे पाहिलं ते पाहावं लागणार नाही. २२ जानेवारीला तुम्ही जी रामज्योती पेटवणार आहात त्याने तुमच्या जीवनात गरिबीचा अंधार दूर करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचं जीवन आनंदाने, सुखाने भरलेलं असावं ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे. आमचं सरकार पहिल्या दिवसापासून रामाच्या आदर्शावर चालून देशात चांगले प्रशासन आणि प्रामाणिकपणाचे राज्य असावे यासाठी प्रयत्न करत आहे. हे रामराज्य आहे ज्यामध्ये सर्वांच्या विकासाची प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं ते म्हणाले मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. हे ऐकून तर खूप चांगलं वाटतं. मात्र वास्तव हे आहे की महाराष्ट्राचा गौरव वाढतो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि इथल्या प्रगतीशील सरकारमुळे होतो आहे. प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली आहे. मला आज खूप आनंद होतो आहे की सोलापूरमधल्या गरीबांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं आहे. मी ते काम पाहिलं तेव्हा वाटलं मलाही लहानपणी अशा घरात राहता आलं असतं तर किती छान झालं असतं असं वाटलं. आज मी जेव्हा या गोष्टी पाहतो, तेव्हा मनात खूप आनंद होतो. हजारो कुटुंबांची स्वप्न जेव्हा साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी पुंजी असतात असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले.

देशातील २५ कोटी लोकांनी गरिबीला पराभूत केलं हे मोठं यश आहे. देशाच्या गरिबांना सुविधा दिल्या. साधने दिली. त्यांची चिंता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वात मोठी चिंता दोन वेळची भाकरी,आमच्या सरकारने गरिबांना मोफत रेशन देऊन चिंतामुक्त केलं. अर्धी रोटी देण्याच्या घोषणा दिल्या नाहीत,”असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला.