12 जिल्ह्यातील देवस्थांनाना जोडणारा ‘शक्तिपीठ’ महामार्ग

2024 महाराष्ट्र सरकारने नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचे घोषणा केलेली आहे या महामार्गामुळे दोन्ही ठिकाण मधील प्रवासाचा वेळ 21 तासाहून अकरा तासावर येणार आहे. या शक्तीपीठ एक्सप्रेस वेळेमुळे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग कोकण हे सर्व जोडले जाणार आहेत आणि पुढे हा प्रवास गोव्यापर्यंत जाणार आहे महामार्ग हा एमएसआरडीसीच्या अंतर्गत बांधला जाणार आहे आणि हा महाराष्ट्रातील तीर्थस्थळे आणि कोकण गोवा अशी पर्यटन स्थळे यामध्ये जोडले जाणार आहेत.

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन नागपूर-गोवा महामार्ग दोन्ही शहरात थेट कनेक्टिव्ही निर्माण करणार आहे. या महामार्गामुळं 21 तासांचा वेळ कमी होऊन 11 तासांवर होणार आहे. म्हणजेच नागपूरहून गोवा गाठणे आता 11 तासांत शक्य होणार आहे. या महामार्गाचे दुसरे वैशिष्ट्यै म्हणजे, हा माहामार्ग 12 जिल्ह्यातील देवस्थानांना जोडणार आहे. यात दोन ज्योतिर्लिंग आहेत. एक म्हणजे परळी वैजनाथ आणि दुसरे हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यातील जागृत देवस्थान या महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अशा मंदिरांना हा महामार्ग जोडण्यात येणार आहे. या महामार्गाचे एक उद्देश म्हणजे, पर्यटन क्षेत्रांचा विकास आणि या पर्यटनाला चालना देणे हे आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 86,000 कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांमधील तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेली माहुरची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जोडली जाणार आहेत. तसेच अंबाजोगाईही या महामार्गावर येते.याबरोबरच मराठीचे आद्यकवी अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, 12 ज्योर्तिलिंग पैकी औंढानागनाथ व परळी वैद्यनाथ येथील दोन ज्योर्तिलिंग, पंढरपूरचे विठ्ठल-रुखमाई मंदीरही या महामार्गावर. तसेच अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औंदुबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळेही या शक्तिपीठ महामार्गाने जोडली जाणार आहेत.

भारत देश हा समृद्धी महामार्गामुळे सुधारित कनेक्टिव्हिटी मध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावरील देश आहे. अशा महामार्गामुळे देशांमधील व राज्यांमधील बऱ्याच गोष्टींना मोठ्या प्रमाणात लाभ होतो. तसेच या शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडले गेल्यामुळे आपोआपच पर्यटन आणि व्यापार वाढण्यास मदत होईल, त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात याचा हातभार लाभेल. महामार्गाच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार लागत असल्यामुळे रोजगार निर्मिती देखील होईल. राज्यामध्ये अशा सुधारित रस्त्यामुळे दळणवळण व्यवस्था सुरळीत होते . प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होतो . वशहरातील आणि गाव भागातील कमी वेळामध्ये ये-जा करण्यासाठी चांगला उपयोग होतो.