व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली

अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षांना ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसीतील ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजेच्या परवानगीवर बंदी घालण्यासंदर्भात मुस्लिम बाजूच्या याचिका फेटाळल्या आहेत. व्यासजी तळघरात पूजा सुरू राहील असा निर्णय न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने दिला. या प्रकरणी मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मुस्लिम पक्षकारांनी असा दावा केला की, जिल्हाधिकाऱ्यांना वाराणसी कोर्टाने रिसीव्हर म्हणून नियुक्त केले आहे, जे आधीपासूनच काशी विश्वनाथ मंदिराचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. मुस्लीम पक्षाने असेही म्हटले आहे की, कागदपत्रात कोणत्याही तळघराचा उल्लेख नाही. व्यासजींनी पुजेचे अधिकार आधीच ट्रस्टकडे हस्तांतरित केले आहेत. त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाहीत, असे मुस्लिम पक्षकारांनी न्यायालयता सांगितले.

वाराणसी जिल्हा न्यायालयानेही या प्रकरणात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. याच निर्णयाविरोधात मु्स्लिम पक्षाने अलाहाबाद कोर्टात धाव घेतली होती. मात्र, येथेही त्यांच्या हाती निराशाच आली आहे. अलाहबाद न्यायालयाने ज्ञानवापी उच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंच्या पूजाचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. तर, मुस्लिम पक्षकारांकडून अद्यापही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे.

ज्ञानवापी मशीद प्रकरणाच हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी वृत्तसंस्था एएनआयशी याबाबत बोलताना सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामियाच्या आदेशावरील पहिले अपील आज फेटाळले आहे. ज्यात वाराणसी जिल्हा न्यायालयाने 17 आणि 31 जानेवारीच्या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर आव्हान दिले होते. कोर्टाच्या निर्णायानुसार ज्ञानवापी संकुलातील ‘व्यास तहखाना’मध्ये सुरू असलेली पूजा सुरूच राहणार आहे. अंजुमन इंतेजामिया सर्वोच्च न्यायालयात आल्यास आम्ही आमचे कॅव्हेट एससीसमोर दाखल करु.