अभिनेत्री यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 23 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 52 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये झाली आहे.
या चित्रपटात यामी गौतमने एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अरुण गोविल यांनी या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. सिनेमात मध्यंतराआधी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची एन्ट्री होते. त्यांनी किती हुशारीने आर्टिकल 370 हटवलं, हे दाखवण्यात आलंय. आधी सांगितल्याप्रमाणे ‘आर्टिकल’ 370′ काहीसा प्रचारकी वाटत असला तरीही मनोरंजन करणारा आहे, यात शंका नाही. दिग्दर्शक आदित्य जांभळे यांचं दिग्दर्शन कमाल आहे. आवश्यक तिथे थरारक युद्धप्रसंग पेरण्यात आल्याने सिनेमातली रंजकता टिकून राहते. याशिवाय शेवटी एकीकडे संसदेत चालणारी राजकीय लढाई तर दुसरीकडे काश्मीरमध्ये जवान दहशतवाद्यांशी करत असलेला सामना आहे. ‘द फॅमीली मॅन’ फेम प्रियामणीने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची सचिव असणाऱ्या राजेश्वरीची भूमिका साकारली आहे. यामी गौतम सुद्धा एनआयए प्रमुख जुनीच्या तडफदार भूमिकेत दिसते आहे. मराठमोळा कलाकार वैभव तत्ववादी मिलिटरी ऑफिसरच्या भूमिकेत लक्षात राहतो.
जम्मू- काश्मीरमधील समस्येचे मुळ कारण कलम 370 होते. जगमोहन हे काश्मीरचे राज्यपाल असल्यापासून त्यांनी हे कलम हटविण्याची मागणी केली होती. मात्र, काँग्रेसच्या सरकारांनी विरोध केला. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी जगमोहन यांची भूमिका साकारली आहे.
