देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठीपुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रतिभाताई पाटील यांचे वय 89 वर्ष इतके आहे. त्यांनी 2007 ते 2012 दरम्यान राष्ट्रपतीपद भूषवले. आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

काल बुधवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल केले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. कायदेतज्ज्ञ प्रतिभाताई पाटील या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली आहेत.

प्रतिभा पाटील यांनी २००७ ते २०१२ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले. त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळात अनेक खाती देखील सांभाळली आहेत. प्रतिभा पाटील या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात सदस्य म्हणून देखील निवडून गेल्या आहेत. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा देखील राहिला आहेत.

आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य समाजकल्याण, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री, असे मंत्रीपदे भूषवत विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड, राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली. १९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभा सदस्य झाल्या. राष्ट्रपती पदावर असताना प्रतिभाताई पाटील यांनी संपूर्ण जगात त्यांनी भारताची नवी ओळख करून दिली.