रोहित पवार बालमित्र मंडळाचे अध्यक्ष!, तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा; अमोल मिटकरींची टीका

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात टीका टीकाटिपण्णी केली जात आहे. अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझी लायकी बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहेत. “तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास. दादा, जे कष्ट करुन इथवर आलेत, ते तुला करायचे काम पडले नाही. शेतकरी पुत्र म्हणून मरेपर्यंत आम्ही दादासोबत आहोत. जयंत पाटील साहेब, आहेत तोपर्यंत जबाबदारीचे पत्र घेऊन घे कारण तुझी खरी ‘लायकी’ फक्त त्यांनाच माहित आहे. बालबुद्धी हीच तुझी लायकी”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर केली आहे.

जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत जबाबदारीचे पत्र घेऊन घे कारण तुझी खरी लायकी फक्त त्यांनाच माहित आहे. बालबुद्धी हीच तुझी लायकी, असं मिटकरी म्हणालेत.तुम्ही आता पक्षात अजित पवार बनण्याचा प्रयत्न करत आहात, ते कधीही होणार नाही. तुम्हाला माझं आव्हान आहे की, तुमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुढील तीन दिवसात पक्षाची जबाबदारी दिली आहे, अस एक पत्र घेऊन यावं. जयंत पाटील त्यांच्या संघर्ष यात्रेत येत नाहीत. त्याचा किती विसंवाद आहे ते दिसून येत आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

श्रीनिवास पाटील यांना पुत्र प्रेमाचा मोह झालाय.असं अमोल मिटकरी म्हणले होते, यावर रोहित पवार यांनी उत्तर देत अमोल मिटकरी यांची लायकी काढली. ज्यांनी श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे अमोल मिटकरीवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका सामान्य जनतेची आहे. आपल्या काकाला सोडून जाणे हे योग्य नसल्याचे सर्वांना वाटते. त्यामुळे साहेबांच्या विचाराने चालणारे पवार कुटुंब आहे म्हणून आम्ही पवार साहेब सोबत आहोत. अजितदादांनी स्वतः निर्णय घेत स्वतःला पवार कुटुंबापासून वेगळे केले आहे, असं रोहित पवार म्हणाले होते.