श्रीलंकेने ३ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम चिनी आस्थापनांना दिले होते; मात्र चीनशी असलेला करार रहित करून श्रीलंकेने भारताशी करार केला आहे. या प्रकल्पाची क्षमता २२३० किलोवॅट अशी आहे. त्यासाठी भारत सरकार कर्जाऐवजी श्रीलंकेस १ कोटी १० लाख डॉलर (सुमारे ९० कोटी रुपये) अनुदान म्हणून देईल. हे भारताच्या कूटनीतीला मिळालेले यश मानले जात आहे.
चायना फाउंडेशन फाॅर रुरल डेव्हलपमेंटकडून चालवण्यात येणाऱ्या स्मायलिंग चिल्ड्रन फूड पॅकेज प्रकल्पातील मदत घटवण्यात आली. यात दरराेज १४२ शाळांमध्ये १० हजार श्रीलंकन विद्यार्थ्यांना रेशन पाेहाेचवले जात हाेते. ही व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ही सुविधा लवकरच बंद केली जाईल, असे अधिकारी सांगतात. त्याशिवाय फॅक्सियन चॅरिटी प्राेजेक्टची पाच हजार पाकिटेही बंद केली आहेत.
श्रीलंकेने परदेशी संशोधन जहाजांना आपल्या बंदरावर थांबण्यास आता पुन्हा परवानगी दिली आहे. आधी चीनचा आक्षेप असल्याने श्रीलंकेने विरोध केला होता. नुकतेच जपानला तशी परवानगी दिली गेली.
श्रीलंकेने नैनातिवू, डेल्फ्ट (नेदुनथीवू) आणि अनालाईतिवू बेटांवर ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांसाठी चीनशी करार केला होता. श्रीलंकेने हा करार रद्द केला आहे. यामुळे चीन संतापला असून त्याने श्रीलंकेतील नागरिकांना दिले जाणारे मदत थांबवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. तसेच तो श्रीलंकेवर दबाव वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहे. चीनने श्रीलंकेत ‘चायना फाऊंडेशन फॉर रूरल डेव्हलपमेंट’कडून चालवण्यात येणार्या ‘स्मायलिंग चिल्ड्रन फूड पॅकेज’ प्रकल्पातील साहाय्य घटवण्यात आले. यात रोज १४२ शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांना शिधा पोचवला जात होता. ही सुविधा लवकरच बंद केली जाईल, असे अधिकारी सांगतात.
श्रीलंकेच्या ऊर्जा क्षेत्रातील भारताची वाढती उपस्थिती पाहून चीन केवळ शांत बसणार नाही. संरक्षणतज्ज्ञ इंडिका परेरा म्हणाले, चीन देशात भारतीय प्रकल्पांना विराेध करणाऱ्या समूहांना सहजपणे पाठिंबा देऊ शकताे. त्यांना भडकवू शकतो.
