पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या देशाने म्हणजेच भुताननेसर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे. भूतानच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना भूतानने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत. भूतानच्या राजाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ देऊन सन्मानित केले.
समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. या पुरस्काराची सुरुवात केल्यापासून आतापर्यंत केवळ चार मान्यवारांना पुरस्कार प्रदान केला गेला आहे. पंतप्रधान मोदींना आतापर्यंत १५ देशांचा सर्वोच्च नागरि पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या पुरस्कारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून भारतातील १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने भूतानच्या या महान भूमीतील हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो. तसेच या सन्मानासाठी भूतानचे आभार मानतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भूतानच्या या महान भूमीत मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान नम्रपणे स्वीकारतो आणि या सन्मानासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. भारत आणि भूतानमधील संबंध जितके प्राचीन आहेत तितकेच नवीन आणि समकालीन आहेत. 2014 मध्ये मी भारताचा पंतप्रधान झालो तेव्हा माझी पहिली परदेश भेट म्हणून भूतानला जाणे स्वाभाविक होते. 10 वर्षांपूर्वी भूतानने केलेले स्वागत आणि आपलेपणा यामुळे पंतप्रधान म्हणून माझ्या भेटीची सुरुवात संस्मरणीय ठरली. भारत आणि भूतानच्या तरुणांच्या आकांक्षा आणि उद्दिष्टे सारखीच आहेत.
यादरम्यान पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी त्यांनी थिंपू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगतुक यांची भेट घेतली. त्यापुर्वी पंतप्रधान मोदी यांचं स्वगत केलं. पंतप्रधान मोदी दोन देशांमधील संबंध सदृढ करण्याच्या उद्देशाने भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.
