ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून ते पाडावे लागणार असल्याचे मार्च महिन्यात स्पष्ट झाले होते. दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट झालं होतं. अखेर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलीस स्टेशन 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी, यासाठी किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय मांडला. तसेच सीआरझेड कायदा उल्लंघनाची कारवाई करण्याची मागणी केली. सोमय्या यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले होते की, कोणावरही सरसकट कारवाई होणार नाही. मात्र ज्याचा अनधिकृत बांधकाम आहे. त्यावर कारवाई नक्की होणार आहे. अनिल परब आणि सदानंद कदम गावकऱ्यांना पुढे करून भावना भडकवण्याचा काम करत असेल तर त्यांना यश मिळणार नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी असलेल्या वादग्रस्ताच्या शाहीर रिसॉर्ट प्रकरणात माजी परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह आणखी दोघांविरोधात कलम 420 अंतर्गत दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीच्या गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी दिलेल्या जबाबानुसार ही कारवाई केली गेली होती.
अलिबाग येथील रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यासंदर्भात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तत्कालीन पदाधिकारी व संबंधितांनी जुने रेकॉर्ड बदलले. भ्रष्टाचाराविरोधात लढा देताना न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यावर माझी भूमिका बाकी राहत नाही व मी कोणतेच आंदोलन थांबवले नसल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
