एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून काढतोय, अशातच दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिलीय. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (15 एप्रिल) पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असं भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवलं आहे.
हवामान विभागाने माॅन्सून हंगाम 2024 चा आपला पहिला दीर्घकालीन अंदाज आज (ता.15) जाहीर केला. या अंदाजानुसार देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर नैऋत्य भारात, ईशान्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.1971-2020 या वर्षांदरम्यान देशातील माॅन्सून काळात पावसाची सरासरी 87 सेंटीमीटर आहे,असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.
देशात यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच यंदा देशात समाधानकारक पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची स्थिती चांगली राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
एल निनो हा हवामानाचा नमुना आहे. यामध्ये समुद्राचे तापमान 3 ते 4 अंशांनी वाढते. त्याचा प्रभाव 10 वर्षांत दोनदा येतो. त्याच्या प्रभावामुळे जास्त पाऊस असलेल्या भागात कमी पाऊस आणि कमी पाऊस असलेल्या भागात जास्त पाऊस होतो. एल निनोमुळे भारतात मान्सून अनेकदा कमकुवत असतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
