माझ्याकडे आई आहे…अजित पवार यांचे विरोधकांना उत्तर

बिग बी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवाद असलेल्या दिवार चित्रपटाची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत करुन दिली. दिवार चित्रपटात शशी कपूर अमिताभला उत्तर देतो, ‘मेरे पास मां है’. तसेच उत्तर आज अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी कृतीतून आणि माध्यमांशी बोलताना आई आपल्यासोबत नसल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांची आई त्यांच्यासोबत होती अन् अजित पवार माझ्याकडे माझी आई आहे. तिचा मला आशीर्वाद आहे, असे रोखठोक सांगत सर्व विरोधकांना उत्तर दिले.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान होत आहे. अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क आज बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. सातत्याने मी जनतेला सांगतोय ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. पवार परिवारामध्ये सगळ्यात जेष्ठ, सगळ्यात वयाने जेष्ठ या आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आहे माझ्याबरोबर आहे. याची नोंद कृपा करुन सर्वांनी घ्यावी. मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनीपण मतदान केलं आहे. आम्ही आमच्या परिने व्यवस्थित महायुतीचा उमेदवार या नात्याने सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केल्याचं अजित पवार म्हणाल.

बारामती आणि वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नसल्याचं अजित पवार म्हणाले

अजित पवार यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. काही जणांनी क्रिकेट बोर्डाकडे जायचे आहे म्हणून मुंबईत नावे केले. परंतु मी आमच्या गावातील काठेवाडीतील नाव कधीच कमी केली नाही. आता या निवडणुकीसाठी मी सर्वांना शुभेच्छा देत नाही. मी आमच्या उमेदवारास शुभेच्छा देत आहे. जो उमेदवार निवडून येईल, त्याला शुभेच्छा देत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.