राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.
आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर ११ वाजेपर्यंत १८. १८% मतदान झाले. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच ११ मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे पहिल्या २ टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – २०.७४ टक्के
सांगली – १६.६१ टक्के
बारामती – १४.६४ टक्के
हातकणंगले – २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के
