महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारलीये, यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागलाय.. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारलीये. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय.. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. दरम्यान आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे. दहावीचा निकाल कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. या बाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्रकारांनी १० वीचा निकाल कधी लागणार या बाबत प्रश्न विचारला होता. यावेळी केसरकर यांनी १२ वीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचे अभिनंदन करत १० वीच्या निकालात अपडेट दिली आहे. दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. अशी माहिती पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी दिली. बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस अगोद जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता.मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदानं होणं बाकी होतं. त्यामुळं राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला असं दीपक केसरकर म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचं असल्यास ते बसू शकतात, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.
आरटीई प्रवेशासाठी पालकांनी खोटी कागदपत्रे बनवून प्रवेश घेणं चुकीचं आहे. खोटी कागदपत्रं तयार करणं गुन्हा आहे. कारवाई झाल्यानं पालक खोटी कागदपत्रं सादर करणार नाहीत, अशी खात्री असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. आरटीई प्रवेशाबाबत गैरप्रकार घडू नयेत याबाबत सूचना देणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. आरटीई प्रवेशप्रक्रिया जिल्हास्तरावर होत असते, असं केसरकर म्हणाले.
