पुणे अपघात प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन, तपासात दिरंगाई आणि वरिष्ठांना माहिती न दिल्याचा ठपका

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका या दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला, त्यामुळे दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे. तसंच हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्यूटीवर तैनात होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलिस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली, त्यांचा हेतू नेमका काय होता, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप केले जात होते. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात दिरंगाई करण्याला दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

पुणे येथील या चर्चेतील अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अपघाताचा तपास करण्यात येणार आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

पुणे शहरात चौथी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून झाली आहे. पुणे शहरात आणखीन 17 बार आणि पब्सवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील 17 बारचे परवाने करण्यात आले निलंबित करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या पब्स आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई झाली आहे. 4 दिवसांत एकूण 49 बार आणि पब्सचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे. शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 14 पथकांकडून कारवाई होत आहे.