संजय राऊत यांनी काल सामनाच्या लेखातून भाजपावर केलेल्या आरोपावरून भाजप अजूनही टीका करत आहे.नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. त्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असे संजय राऊत यांनी कालच्या (२६ मे) सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून म्हटले होते.राऊतांच्या आरोपानंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली.दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.’गांजा पिऊन लेख’ लिहिणाऱ्यांबाबत काय बोलणार, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
पमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुळात म्हणजे संजय राऊत यांच्याबाबत मला एकही प्रश्न विचारत जाऊ नका. ‘जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात’ त्यांच्याबाबद्दल काय बोलावे.मला अशी माहिती आहे की, ते लंडन गेले आहेत.लंडनमध्ये चांगले मानसोपचार तज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी तेथे चांगले उपचार घ्यावेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या. आमच्यात काही गडबड नाही. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे नेते बसवून ठरवतील. भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला जास्त जागा मिळतील. इतर पक्षाचा सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारलाच बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला जास्त जागा मिळतील. इतर पक्षाचा सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारलाच बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
