सध्या देशासह राज्यात विविध ठिकाणी उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. देशातील काही भागात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. अशात अनेक लोकं घरातून बाहेर पडणं टाळतायत. तर काही जणांना कामानिमित्त बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही,अशात कर्मचाऱ्यांनी वाढती उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी खास सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. जाणून घ्या त्यात काय म्हटलंय.
सध्या सतत वाढत असलेल्या तापमानामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हैराण झाले आहेत. अशा वातावरणात बाहेर काम करणा-या लोकांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. हे लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कर्मचा-यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय अवलंबण्यास सांगितले आहे, जेणेकरून कर्मचा-यांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे, अशात लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
उन्हामुळे लोकांना दिवसाच नाही तर रात्रीही आराम मिळत नाही. आरोग्य मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी देखील अति उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कर्मचा-यांना कोणतीही अडचण येणार नाही. आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समान सुविधा देण्यास सांगितले आहे. तसेच, कर्मचा-यांना दिवसाच्या कडक उन्हात बाहेर ड्यूटी करणे टाळण्यास सांगितले आहे. जेव्हा हवामान थंड असेल तेव्हाच बाहेरील कामे शेड्यूल करा, कर्मचा-यांना देखील विश्रांती द्या. असे म्हटले आहे.
तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसतंय, अशात लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हामुळे लोकांना दिवसाच नाही तर रात्रीही आराम मिळत नाही. आरोग्य मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी देखील अति उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
