पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यात ससूनच्या डॉक्टरांचाही हात असल्याचं समोर आलं असून पुणे पोलिसांनी याप्रकरणात ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली. त्यांना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. या घटनेतील केंद्रस्थान बनलेल्या ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याची माहिती आहे. हा कर्मचारी कोण आहे आणि त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे सध्या समोर आलेलं नाही.
प्राथमिक माहितीनुसार, ससूनच्या रक्त चाचणी विभागातील हा कर्मचारी सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून कोणीही बेपत्ता नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात पोलीस या कर्मचाऱ्याचा शोध घेत असल्याचे समजते. पोलिसांनी ससून रुग्णालयातील पुणे अपघातानंतरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून बारकाईने पाहिले जाईल. त्यानंतर रक्त चाचणी विभागाच्या परिसरात असणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना आम्ही चौकशीसाठी बोलावणार आहोत. जो कर्मचारी चौकशीला येणार नाही, त्याला जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.
सुरुवातीला फक्त एक डिंक अँड ड्राईव्ह अपघात असे स्वरुप असलेल्या या प्रकरणाने पुण्यातील संपूर्ण शासनयंत्रणेची पोलखोल केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील पोलीस, आरोग्य आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराची काळी बाजू समोर आली आहे. सध्या ससून रुग्णालय हे पुणे अपघात प्रकरणाचे केंद्रस्थान बनले आहे. दरम्यान, आज रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचे सांगितले जात आहे. हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि याप्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, हा कर्मचारी गायब नसल्याचे पोलीस सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते त्याचा शोध घेत असल्याचे समजत आहे. तसेच पुणे अपघातानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. जो येणार नाही, त्याला शोधून जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.
