पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत असतानाच आता या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई शिवानी आग्रवालचीही चौकशी होणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी पैसे घेऊन रक्ताचे नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे या अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याप्रकरणी त्याचे वडील विशाल अग्रवालही अटकेत आहे. विशाल अग्रवालचे वडिलांनाही या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. असं असतानाच आता या प्रकरणात या मुलाच्या आईचाही हात आहे का याचा तपास केला जात आहे.
अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात नेलं होतं. तिथं डॉक्टर श्रीहरी हरनोळने रक्ताचे योग्य नमुने घेतले होते. मात्र त्यानंतर रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्तींकडून दबाव टाकला गेला. त्यामुळे हरनोळ याने सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन तीन रक्ताचे नमुने घेतले. यामध्ये एक नमुना अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचे होते. आता या प्रकरणी पुणे पोलीस शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत आहेत.
डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिलेल्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे. ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीचे म्हणून तीन व्यक्तीचे ब्लड सँपल घेण्यात आले. त्यात एक महिला आणि दोन वयस्कर व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. डॉक्टर श्रीहरी हरणोळ याने हे तीन ब्लड सम्पल घेतले. सबंधित महिलेची ब्लड सम्पल हे अल्पवयीन आरोपीच्या आईचे ब्लड सम्पल असल्याची माहिती अहवालात दिली आहे.
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात डॉ. अजय तावरेचा डॉ. श्रीहरी हाळनोरवर दबाव होता, अशी माहिती समोर आली आहे. डॉ. तावरे व विशाल यांचे बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी मला तावरे यांनी दबाव टाकला, अशी कबुली हाळनोर यांनी दिली. रक्त बदल केले हे माझ्या मनाला पटत नव्हते. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते, असे हाळनोर यांनी म्हटले आहे. डॉ. श्रीहरी हाळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.
