लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले असतानाच मिनिटामिनिटाला मतांची आकडेवारी बदलत आहे. त्यातच आता नवी दिल्लीतून आप आणि काँग्रेस मागे पडले असल्याचे चित्र आहे, तर भाजपाने या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे. नवी दिल्लीसोबतच भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि नवी दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी एकतर्फी पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर बाहेर येऊन प्रचार केल्यानंतरही आप आणि काँग्रेसला फायदा होताना दिसत नाही. भाजपने नवी दिल्लीतील सातही जागांवर आघाडी घेतली आहे.
नवी दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण खंडेलवाल हे काँग्रेसच्या जय प्रकाश अग्रवाल यांच्यापेक्षा पुढं आहेत. उत्तर पूर्व दिल्लीत मनोज तिवारी आणि कन्हैय्या कुमार यांच्यात लढत होती. इथं मनोज तिवारी आघाडीवर आहेत. दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपचे हर्ष मल्होत्रा आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार लढत होते.
नवी दिल्लीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळी देखील दिल्लीच्या मतदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीतून दिसून येत आहे. मद्य धोरण प्रकरणी अटकेच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवत प्रचार केला होता. मात्र, नवी दिल्लीत पुन्हा एकदा भाजपने वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे.
नवी दिल्लीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी प्रमाणं यावेळी देखील दिल्लीच्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीतून दिसून येत आहे.
