लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत येणार की नाही, यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बरीच खलबतं झाली. मात्र, अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वंचतने बहुतांश मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आघाडी घेता आली नाही. २०१९ मध्ये वंचित फॅक्टरचा बोलबाला आपण पहिला. ह्यावेळी मात्र वंचित फॅक्टरचा धुव्वा उडाल्याचं आतापर्यंत दिसून आलं.
लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्याची जनता कुणाला कौल देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. अशातच कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर आहे या आकड्यांमध्ये सतत बदल होताना दिसतोय. अशातच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर पराभवाच्या छायेतअसल्याचं चित्र आहे. अकोल्यात त्यांना धक्का बसल्याचा अंदाज समोर येतोय.
दरम्यान, जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपने यावेळी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप खरंच 400 पार करेल का हे पाहण्याचं ठरणार आहे.
पुण्यात वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त होण्याची भीती
वसंत मोरे यांनी कोरोना काळात पुणेकरांसाठी जबरदस्त काम केले. पुणेकर त्यांना हक्काचा माणूस म्हणून कधी फोन करतात. लोकांच्या प्रश्नांना दाद सोशल मीडियातून ते मिळवून देतात. त्यामुळे सोशल मीडियातील या हिरोला प्रत्यक्षात पुणेकरांनी साथ दिली नाही. सकाळी ११.३० वाजता भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ८६ हजार मते मिळाली होती. परंतु वसंत मोरे यांना फक्त नऊ हजार मते होते. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ७८ हजार मतांसह स्पर्धेत होते. निवडणुकीच्या कलावरुन वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त होण्याची भीती आहे.
