देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे जनतेची व राजकीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक फेरीगणिक नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ठाणे व कल्याणची जागा बालेकिल्ला समजली जाते व या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांनी आपली आघाडी कायम राखली आहे.
ठाण्यातून नरेश म्हस्के १९ हजार मतांनी पुढे आहेत. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १ लाखापेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना ६ जागांवर आपली आघाडी टिकवून आहे.
कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांना हा मोठा धक्का समजला जातोय. त्यामुळे लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.
मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. एक्झिट पोलसच्या अंदाजानुसार या सहाही जागांवर अटीतटीची लढत झाली असल्याने कोणालाच स्पष्ट कौल मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकालानंतरच या सहा जागा कोणाच्या पारड्यात जातात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यामुळे या सहा जागांवर कोणाचं सर्वाधिक वर्चस्व राहतंय यावरच आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल अवलंबून असल्याचंही बोललं जातंय.
