“काँग्रेस पुढच्या 10 वर्षांतही 100 चा आकडा पार करू शकणार नाही”, एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींना विश्वास

एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी विविध विषयावर मतं व्यक्त केले. एनडीएची दिल्लीत बैठक सुरु आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला. ईव्हीएमपासून ते लोकशाही प्रक्रियेवर अविश्वास निर्माण केल्याप्रकरणात त्यांनी काँग्रेसला धो-धो धुतले. त्याचवेळी काँग्रेसला त्यांनी निवडणुकीतील कामगिरीवरुन आरसा पण दाखवला. काँग्रेसला 100 चा आकडा सुद्धा गाठता आले नसल्याचा चिमटा मोदींनी काढला.

एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर तुफान प्रहार केले. “पुढच्या 10 वर्षांनीही काँग्रेस 100 चा आकडा पार करू शकणार नाही. 2014, 2019 आणि 2024 या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होते. पण आता आणि मी स्वच्छपणे पाहू शकतो की इंडिया वाल्यांना अंदाज नाहीय की हळूहळू ते बुडत होते, आणि तेजीने ते गर्तमध्ये जाणार आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

‘एनडीए आज देशभरात 22 राज्यात लोकांनी सरकार बनवून सेवा करण्याची संधी दिली. सात राज्यांमध्ये एनडीए नागरिकांची सेवा करत आहेत. आपण सर्व-धर्म समभाव मानत असून सविधानाला समर्पित आहे. आज आपल्याला त्या राज्यांतही एनडीएच्या रुपात सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. प्री पोल अलायन्स हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या इतिहासात तर, युतीच्या इतिहासात प्री पोल अलायन्स कधीच इतके यशस्वी झाले नसेल इतकं एनडीए झालं आहे, ‘असं मोदी यांनी म्हटलं आहे. पुढच्या 10 वर्षात विकासाचा नवा आराखडा रचणार एनडीए सरकार देशाला प्रगतीपथावर नेणार. सुशासन म्हणजे एनडीए सरकार, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

एनडीएला तीन दशक झाले आहे. स्वातंत्र्याच्या75 वर्षात तीन दशक एनडीए ही सामान्य घटना नाही. विविधतेने भरलेल्या देशात तीन दशकाची यात्रा ही मोठ्या मजबुतीचा संदेश देत आहे. संघटनेचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या अलायन्सचा भाग होतो. आज सभागृहात बसून तुमच्या सोबत काम करता करता तुमच्याशी माझंही नातं 31 वर्षाचं झालं आहे. ही सर्वात यशस्वी आघाडी आहे. आपण अभिमानाने सांगू शकतो. पाच वर्षाची टर्म होते. या अलायन्सने 30 वर्षातील पाच पाच वर्षाचे तीन टर्म पूर्ण केले आहेत. आणि चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करत आहोत, असे मोदी म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंची आठवण
जे राजकीय तज्ज्ञ आहेत, जर त्यांनी मुक्त मनाने विचार केला तर एनडीए हे सरकार मिळवण्याचा किंवा सत्ता टिकवण्यासाठी जमलेली टोळी नाही. तर देशसेवेसाठी कटिबद्ध असलेला हा समूह आहे. देशाच्या राजकारणातील ही ऑरगॅनिक अलायन्स आहे. आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी विश्वासाने बिजं रोवली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आमच्या सर्वांजवळ या महान नेत्यांचा वारसा आहे त्याचा आम्हाला गर्व आहे, असेही मोदींनी भाषणात म्हटले.