अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात डीजीसीएची एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन कारवाईची शिफारस

[3:29 pm, 21/6/2025] Harshu: विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या गंभीर विमान अपघातात २७० हून अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तात्काळ चौकशी सुरू केली. प्राथमिक अहवालात नियमांची पायमल्ली आणि व्यवस्थापकीय अक्षमतेचे गंभीर स्वरूप उघड झाले असून त्यासंदर्भात DGCA ने एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची शिफारस केली आहे. ( DGCA recommends immediate suspension of three Air India officials in Ahmedabad plane crash case)

या तिघांमध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि नियोजनाशी संबंधित अधिकारी पायल अरोरा यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांकडून क्रू शेड्युलिंग आणि रोस्टर नियोजनात गंभीर त्रुटी झाल्याचे DGCA च्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अपघाताच्या दिवशी क्रूचे पेअरिंग नियमानुसार केले गेले नव्हते, तसेच उड्डाणाचा अनुभव आणि परवाना अटींचे पालनही झाले नव्हते. यामुळे चालकदला थकवा जाणवून मानवी चूक होण्याची शक्यता वाढली, असे DGCA च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

DGCA ने २० जून रोजी जारी केलेल्या आदेशात एअर इंडियाला या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवून नॉन-ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त करण्याचे आणि त्यांच्याविरोधात शिस्तभंग कारवाई त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अशा व्यक्तींना भविष्यात कोणत्याही क्रू अनुपालन अथवा उड्डाण सुरक्षेशी संबंधित कामांवर नेमले जाऊ नये, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

एअर इंडियाने DGCA च्या निर्देशांना मान्यता देत, या अधिकाऱ्यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून तात्काळ मुक्त केल्याचे निवेदन जारी केले आहे. या अधिकाऱ्यांविरोधात १० दिवसांच्या आत DGCA ला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

DGCA ने भविष्यासाठीही इशारा दिला आहे की, जर पुन्हा अशाप्रकारच्या नियमभंगाची पुनरावृत्ती झाली तर संबंधित एअरलाइन्सविरुद्ध दंड, परवाना निलंबन अथवा उड्डाण परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल.
[3:30 pm, 21/6/2025] Harshu: