शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्षचिन्ह आणि पक्षनावाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी पूर्व येथे विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिंदे गटाला दोन तलवार आणि एक ढाल असं चिन्ह देण्यात आलं होतं. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेच मुळ पक्षचिन्ह आणि पक्षनाव शिंदे गटाला देऊ केल्याने एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण परत मिळाले.यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. राजापुरात आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियान-मेळाव्यात ते बोलत होते.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत. सुरुवातीपासून कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही तत्वासाठी लढाई केली. आमची भूमिका चुकीची असते, तर जनतेने पाठ फिरवली असती. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा मोठं नाव असतं. ते जपायचं असतं. बाळासाहेब ठाकरेंचं विचार हीच आमची संपत्ती होय. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि विचार पुढे न्यायचं आहे. बाळासाहेबांचं विचार हीच आमची संपत्ती होय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
तसेच विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी तत्वांची लढाई केलेली आहे. सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत. बाळासाहेबांची संपत्ती नको मला त्यांची विचार हवे आहेत.असेही शिंदे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमची भूमिका चुकीची असती, तर जनतेने पाठ फिरवली असती. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा मोठं नाव असतं. ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्याचं आम्ही पालन केलं. बाळासाहेब ठाकरेंचं विचार हीच आमची संपत्ती आहे. बाळासाहेबांची संपत्ती आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही जेव्हा बंड केलं तेव्हा 50 कोटींची मागणी केली, त्यांना बाळासाहेब नकोत. त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, त्यांना पैसे हवेत. मी क्षणाचाही विचार न करता 50 कोटी देण्याचा निर्णय घेतला. असाही गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.
