उद्या म्हणजेच ८ डिसेंबर २०२० रोजी देशातली शेतकरी मोठे भारत बंद आंदोलन पुकारताएत. मात्र या आंदोलनात खंरच कितपत शेतकरी आहेत, का शेतकरी नेता आपल्या स्वार्थासाठी हे सर्व करताएत ? असे अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल कांग्रेस, आप, एआयएमआयएम असे सर्व पक्ष समोर आले आहेत. म्हणजे स्पष्ट आहे कि हे आंदोलन शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या भल्यासाठी असो वा नसो मात्र केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नक्कीच आहे. आणि या आंदोलनाला सगळ्यात अधिक समर्थन देताएत ते एकेकाळी कृषिमंत्री असलेले ‘शरद पवार’.
शरद पवार हे देशात सर्वाधिक काळ अर्थात २३ मे २००४ पासून ते २६ मे २०१४ पर्यंत कृषिमंत्री या पदावर होते. त्यांच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. देशातील कृषिविकास दर हा आधीच्या म्हणजेच वाजपेयी सरकारने ४ टक्क्यावर आणला होता मात्र त्यांच्याच काळात हा दर -२% पर्यंत येऊन पोहोचला जो मोदी सरकारने आता ३% पर्यंत आणला आहे. त्यांच्याच काळात कृषिक्षेत्रासंबंधी मोठे घोटाळे देखील समोर आले होते. ते कृषिमंत्री असताना एका पत्रात त्यांनी स्वत: उल्लेख केला आहे कि कृषि क्षेत्राच्या विकासासाठी खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांना एकत्र येऊन कार्य करावे लागेल आणि आज ते स्वत: मोदी सरकारच्या त्याच कायद्याचा विरोध करत देशात अराजकतेचे वातावरण पसरवण्यात हातभार लावताएत. यात काही नवल नाही म्हणा, आजवर देशाच्या विरोधात जे काही होत असेल त्यात शरद पवारांचा हातभार हा लागलाच आहे.
देशाच्या इतिहासात झाकून बघितलं तर शरद पवार हे देशातील सगळ्यात अयशस्वी कृषि मंत्री सिद्ध झाले आहेत. पवारांनी २०१० मध्ये लिहीलेल्या पत्रातील त्यांचे शब्द आहेत, “In this context, the need to amend the present State APMC Act on the lines of Model State Agriculture Produce Marketing (Development and Agriculture) Act 2003 to encourage the private sector in providing alternate competitive marketing channels in the overall interest of farmers/producers and consumers can not be overemphasized.”
जेव्हा २०१० मध्ये शरद पवारांचे शब्द असे आहेत, तर मग आज मोदी सरकारने तयार केलेल्या शेती विधेयकाविषयी त्यांची नाराजी का ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. आपण केलं ते उत्तम आणि समोरच्याने केलं तो कचरा अशी भावना कशी असू शकते पवारांसारख्या नेत्याची ?
पवारांचा हा दुटप्पीपणा बघून एक गोष्ट मात्र सिद्ध होते कि, शरद पवार यांच्यामनात शेतकऱ्यांविषयी कणव असेल किंवा नसेल मात्र या आंदोलनाला आणि एकूणच सध्याच्या परिस्थितीत शेतकरी नेत्यांना समर्थन देण्यामागचे एकच कारण आहे ते म्हणजे मोदी विरोध आणि केंद्र सरकार विरोध.
सामान्य जनतेला आता या सर्व भावना लक्षात आलेल्या आहेत. त्यांच्या मनात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे कि खरा शेतकरी आपल्या अन्नाची नासाडी कधीच करणार नाही, खरा शेतकरी आपली शेतीची कामे सोडून मोठमोठाले ट्रॅक्टर्स घेऊन रस्त्यावर उतरणार नाही, आणि जरका तो उतरला असेल तर यामागे एक मोठे षडयंत्र नक्कीच शिजतेय.
