आधी महाराष्ट्राकडे बघा, मग दिल्ली बद्दल बोला…!

महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. वाढते कोरोना पेशंट्स असू देत नाही तर शेतकऱ्यांच्या समस्या, मात्र महाराष्ट्र सरकार याकडे मुद्दाम दुर्लक्ष करते आहे का ? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेला आहे. या सर्व प्रश्नांविषयी चर्चा करण्याचे एकमेव स्थान म्हणजे विधानसभा, मात्र कोरोना चे नाव घेत महाराष्ट्र सरकारने यंदा केवळ २ दिवसांचे हिवाळी अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा याला विरोध असून सरकार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून दिल्लीच्या आंदोलनाविषयी का बोलते आहे असा प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला खडे बोल सुनावले आहेत, ते म्हणतात, “महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अतिवृष्टि आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र महाराष्ट्र सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाची काळजी करत आहेत. राज्यात जेव्हा मराठा आंदोलन होतंय, त्यावेळी मराठा समाजातील बांधवांना त्यांच्या घरी घुसून मारण्यात येत आहे, मात्र त्यावर राज्यसरकारनी कुठलीच कारवाई केली नाही, आणि ते दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन करत आहेत.” असं म्हणत फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला आरसा दाखवला.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था कठीण झालेली आहे. ओला दुष्काळ आणि बोंडअळी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र असे असून सुद्धा महाराष्ट्र सरकारला राज्यातील शेतकऱ्यांची काळजी नाही, त्यांना दिल्लीत होणाऱ्या शेतकरी आंदोलनाविषयी सहानुभूती वाटते, हा दुटप्पीपणा आहे, असं मत साधाराणपणे महाराष्ट्रातील जनतेचा झाला आहे.

महाराष्ट्राला २०२० मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागला आहे, असे असताना राज्य सरकारचे प्रथम लक्ष्य राज्याच्या विकासाकडे असले पाहीजे, मात्र राज्यात अराजकता वाढत चाललेली आहे, आणि सामान्य माणसाचे मात्र हाल होताएत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *