
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी भीषण होत चालली आहे. असे असताना, सामान्य माणूस म्हणून आपला जीव रोज थोडा थोडा तुटतोय. आपल्या माणसांना आपल्यापासून लांब जाताना बघतना, तरुण मुलांना जीव गमावताना बघताना एक सामान्य माणून म्हणून भयंकर त्रास होतोय. आणि ते होणे सहाजिक देखील आहे. आज ठाणे येथे वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ४ नागरिक मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे, तर दूसरीकडे नागपूर येथे २० मेट्रिक टन ऑक्सिजन घएऊन ऑक्सिजनचे टँकर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून आणण्यात आले आहेत. एकीकडे नागरिकांचा जीव जातोय, तर दूसरीकडे प्राणवायू त्यांचा जीव वाचवतेय. मन अस्वस्थ करणारं असं दृश्य सध्या महाराष्ट्रात बघायला मिळतंय.
महाराष्ट्रात आता पर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांना कोरोना होऊन गेलाय. त्यापैकी ३५ लाख लोक बरे देखील झाले आहेत, आणि ६४ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव या भयंकर महामारीमुळे गमवावा लागलाय. एकूणच प्रचंड अस्वस्थ करणारं असं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. आज सकाळी ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हॉस्पिटल प्रशासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात जमण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ऑक्सिजनअभावी झाला की, अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत अद्यापही रुग्णालय प्रशासनानं कोणतीही माहिती दिलेली नाही.
नाशिक येथील दुर्दैवी घटना आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. एकूणच आज माणूस कीडा मुंगी प्रमाणे मरतोय. आणि जनतेचा मोठ्या प्रमाणात रोष सरकारवर देखील आहे. राज्य सरकारला ही परिस्थिती हाताळता आली नाही, राज्य सरकार भ्रष्टाचार आणि १०० कोटी रुपयांची वसूली करण्यात गुंग होतं, अशी मतं राज्यातील सामान्य जनतेनी मांडली आहेत. एकूणच प्रशासन म्हणून राज्य सरकार आणि कोरोनाला गांभीर्याने न घेणारे म्हणून सामान्य नागरिक म्हणून आज आपण सर्वच अपयशी ठरलो आहोत. जर या संकटातून बाहेर यायचं असेल, तर आपण सगळ्यांना एकत्र मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे. सध्या घरातून बाहेर न निघणे, सतत हात धुणे, दिवसातून २ दा आंघोळ करणे, कपडे व्यवस्थित धुणे, सॅनेटाइझ करणे हे सर्व आपल्याला तो पर्यंत तितक्याच शिस्तित करायंचं आहे, जो पर्यंत या रोगाचा समूळ नाश होत नाही. तसे केल्यासच केवळ आपण हे चित्र बदलू शकतो. अन्यथा काय होईल हे काळच सांगेल. त्यामुळे घरी रहा, काळजी घ्या.
