आपल्या महाराष्ट्राला आज आपली गरज आहे…



गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्राला जणू कुणाची दृष्ट लागलेली आहे. महाराष्ट्रावर सतत कोसळणाऱ्या संकटांमुळे आपला महाराष्ट्र आज अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. आज चिपळूण आणि महाड येथे आलेल्या पुराने काही क्षणातच अक्षरश: अनेक परिवार उद्ध्वस्त केले. आधी कोरोना, मग अतिवृष्टीने पीकांचे झालेले नुकसान,  मग आता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेला हा पूर याने जणू महाराष्ट्राला कोलमडून पाडायचं ठरवलं आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र काही अशा संकटांमुळे कोलमडणार नाही. आज आपल्या महाराष्ट्राला आपली गरज आहे.



कोरोना काळात देशातील सर्वात प्रभावी राज्य म्हणून महाराष्ट्राला प्रसिद्धी मिळाली. सरकार यंत्रणांचा हलगर्जीपणा, आणि एकूणच नवीन सरकारच्या अनुभवात कमी असल्या कारणाने, आणि संकट काळात सरकारमधीलच लोक कंगना रणौतचे घर पाडणे, 100 कोटींची वसूली अशा अनेक घटनांमध्ये व्यस्त असल्या कारणाने महाराष्ट्रातील जनतेचे पुरते हाल झाले. सेटल होण्याच्या दृष्टिने पुणे मुंबईकडे बघणारे लोक आता, तिथे जाण्यापासून देखील काढता पाय घेऊ लागले. त्यात अतिवृष्टि आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि आता या पुराने तर अनेक परिवारांना मुळापासून उद्ध्वस्त केलं. हे अतिशय भयंकर आहे. आणि अशा काळात सरकारने पुरग्रस्तांना धीर धरायला सांगणे म्हणजे जणू पापच.

आताच्या परिस्थितीत अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. आणि मदत करण्यात तत्पर आहेत. आपण देखील आपल्या बांधवांना मदत करावी. खालील दिलेल्या माहितीवर आपण आपली मदत करू शकता. आज महाराष्ट्रातील बांधवांना आपली गरज आहे. आणि आपण सरकारवर अवलंबून न राहता त्यांच्या मदतीला धावून गेलेच पाहीजे.

आवश्यक साहित्य
1.पिण्याचे पाणी (कॅन बाटल्या इत्यादी)

  1. मेणबत्या / सोलर चार्जर, काडेपेट्या.
    3.बेडशीट , चादरी, सतरंजी.
  2. साड्या, ड्रेस, टी-शर्ट, टॉवेल, अर्धी विजार.
    5.क्लोरोवॅट अथवा अन्य पाणी शुद्धीकरण सामग्री.
  3. फ्लोअर वायपर, सॅनिटायझर कॅन,डीडीटी पावडर, जंतुनाशक पावडर.
  4. फवारणी पंप आणि औषध, फिनेल कॅन
  5. बेबी फुड / दूध पावडर
  6. ताडपत्री (90×90, 90×72, 15×18)
    10.औषधे (Paracetamol , Cetrizene), इलेक्ट्रॉल पावडर, ग्लुकोज पावडर.
  7. रेडी मिक्स फुड ( खिचडी , उपमा) इत्यादी.
  8. धान्य, तांदूळ, डाळ, तेल, मीठ, तिखट, चहा पावडर, साखर, आटा इत्यादी. संपर्क सूत्र
  9. महाड बेस कॅम्प- बुटाला सभागृह, मुंबई -गोवा महामार्ग, महाड
    श्री. गणेश मेहेंदळे 7020600830
  10. चिपळूण- श्री. उदय चितळे, पाग पॉवर हाऊस, चिपळूण. 8446281551

आर्थिक सहायता

  1. http://www.rssjankalyan.org/seva -nidhi/
  2. Account- RSS JANAKALYAN SAMITI, Bank of Maharashtra,
    Acct No. 20057103852
    IFSC. MAHB0000041

Seva4Society #RSS4Nation



आपला खारीचा वाटा देखील कुणासाठीतरी जीवनदान ठरू शकतो. या बांधवांना अगदी शून्यातून आपले विश्व घडवायचे आहे. अनेकांचा उभा संसार मोडून पडलाय, अनेक मुले अनाथ झाली आहेत, अनेकांनी वर्षों जमा केलेली साधन संपत्ती आज पाण्यात गेली आहे. त्यांना हात धरून यामधून बाहेर काढावे लागणार आहे. एक पाऊल आपणही पुढे उचलूयात. खाली दिलेल्या माहितीवरून तुम्ही मदत करू शकता.

चला पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र नव्याने उभा करूयात.