
प्रख्यात इतिहासकार शिवसशाहीर बाबा साहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार शंभरावा वाढदिवस आहे. या निमित्ताने पुणे येेथे त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील शिवसृष्टी येथे स्ते त्यांचा लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
बाबासाहेब पुरंदरेंचं काम हे गौरवास्पद असून त्यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेब पुरंदरेंच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवकल्याण राजा आणि जाणता राजाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज घराघरांर्यंत पोहोचविले.
युगपुरुष छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण आजही प्रयत्न करत आहात, आपल्याला शंभराव्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा असा संदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
