नवाब मलिकांच्या विरोधात समीर वानखेडेंचे वडील कोर्टात, दाखल केला 1.25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा…!

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत असलेले प्रकरण म्हणजे समीर वानखेडे आणि नवाब मलिक प्रकरण. आर्यन खान आणि त्यांच्या ग्रुप वर कारवाई करणारे समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिकांनी बंड पुकारले आहे. त्याचे मोठे कारण म्हणजे त्यांच्या जावयावर देखील ड्रग्स संदर्भात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चढत गेलं. आता समीर वानखेडे यांच्या वडीलांनी नवाब मलिकांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली असून त्यांच्यावर 1.25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक हे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आहेत, आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यांना उत्तरं दिली जात आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आरोप म्हणजे, जातीच्या बोगस दाखल्याद्वारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा हा होय. तसेच समीर वानखेडे जन्मानं मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपाविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला आहे. आज, सोमवारी याची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. मंत्री नवाब मलिक यांनी त्यानंतर आरोपाचे बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. सततच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर 1 कोटी 25 लाख रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांच्याआधी भाजप नेता मोहित कंबोज यांनीही नवाब मलिक यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.


एकूणच राज्याचे माजी गृहमंत्री भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणात अडकतात, फरार होतात, राज्याचे मोठे पोलिस अधिकारी ज्यांना राज्याची धुरा ज्यांच्या हातात आहे, त्यांच्या सिफारशीवर परत कामावर घेगतले जाते, ते भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलची हवा खातात, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांचा जावई ड्रग्स केस मध्ये अडकतो, असे राज्य सरकार जनतेच्या कल्याणासाठी कसे काम करू शकेल? एकूणच हे सरकार भ्रष्टाचारी आणि चुकीच्या कामांमध्ये लिप्त असलेले सरकार असल्याचा अनुभव पदोपदी जनतेला येत आहे, त्यामुळे आता या महाराष्ट्राचे पुढे काय होणार याची एकच चिंता जनतेच्या मनात आहे. पुढे काय होतं, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.