आज कोण बॉम्ब फोडणार? देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांची आज पत्रकार परिषद



दिवाळीच्या आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले होते कि ते दिवाळी नंतर एक गौप्यस्फोट करणार आहेत, किंवा “बॉम्ब” फोडणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे, तर या पत्रकार परिषदेत ते हा “बॉम्ब” फोडणार का ? असे प्रश्न राज्याच्या जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत, आणि या पत्रकार परिषदेत काय होणार अशी उत्सुकता सगळ्यांच्या मनात लागलेली आहे.

त्यासोबतच आज राज्याचे अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील पत्रकार परिषद आयोजित केली आहे. एकूणच सध्या राज्यात आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन चर्चेचे वादळ उठले आहे. नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर लावलेले आरोप, त्याच्या उत्तरात समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केलेल वक्तव्य, समीर वानखेडे यांच्या वडीलांनी नवाब मलिकांवर ठोकलेला मानहानीचा दावा या सर्व पार्श्वभूमीवर आज नवाब मलिक आणखी काय आरोप प्रत्यारोप करतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.



एकूणच आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात सतत काही ना काही होत आहे, पहिले मनसुख हिरेन प्रकरण, त्यानंतर परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट, राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर ईडीनी केलेली चौकशी इत्यादि पाहता एकूणच पुन्हा एकदा राज्याचे आणखी एक मंत्री धोक्यात आले आहेत, आणि कदाचित त्यापासून वाचण्यासाठी हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आजच्या या दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये काय होणार ? आणखी किती बॉम्ब फुटणार ? पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होणार का ? हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.