
राज्यात कोळशाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा शिल्लक राहिला आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना विजेच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोळसा उपलब्ध होत नसल्याने पुन्हा एकदा राज्यात भारनियमन सुरु होण्याची शक्यता ऊर्जामंत्र्यानी व्यक्त केली आहे.
आपल्या घरातील विजेचा वापर जपून करावा लागणार आहे. कारण पुन्हा राज्यात विजेचे भारनियमन सुरू होणार आहे आणि याला कोळसा कारण ठरला आहे. याच कोळशातून वीज प्रकल्पात वीज तयार होते. मात्र आता केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा राज्यातल्या वीज प्रकल्पात शिल्लक आहे.
राज्यातील वीज प्रकल्पांमध्ये असलेला कोळसा साठा :
कोराडी वीज प्रकल्प – तीन दिवस पुरेल इतकंच कोळसा
- नाशिक वीज प्रकल्प – दोन दिवस पुरेल इतकंच कोळसा
- भुसावळ वीज प्रकल्प – एक दिवस पुरेल इतकंच कोळसा
- परळी वीज प्रकल्प – दीड दिवस पुरेल इतकंच कोळसा
- पारस वीज प्रकल्प – साडेचार दिवस दिवस पुरेल इतकंच कोळसा..
- चंद्रपूर वीज प्रकल्प – सहा दिवस पुरेल इतकंच कोळसा
- खापरखेडा वीज प्रकल्प – 12 दिवस पुरेल इतकंच कोळसा
- राज्यात सध्या 6 लाख 75 हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे.
एकूणच राज्यात वाढत चाललेल्या गर्मी आणि सोबत असलेल्या विजेच्या तुटवड्याकडे बघता नजिकच्या भविष्यात विजेसंबंधी मोठे संकट येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. यासंदर्भात राज्य सरकार काय तोडगा काढते याकडे बघणं महत्वाचं ठरेल.
