
“मी कालच म्हटले होते, “विरोधी पक्षावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र सत्तापक्षाचे सुरु आहे.” आणि आज सत्तापक्षाने माझे म्हणणे खरे ठरवत प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा केवळ यासाठी दाखल करण्यात आला कारण ते मजूर एका मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. सरकार हे सर्व केवळ विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी करत आहे, मात्र आम्ही घबरत नाही, आम्ही न्यायालयात जाऊ.” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. बँकेसंबंधी एका प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्यावर विरोधीपक्षाने सरकारवर जोरदार टीका केली.
तुमच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा संघर्ष सुरुच राहील :
“सत्तापक्षाचा भ्रष्टाचार वेळोवेळी आम्ही आणला आहे. यामुळे सूडाच्या भावनेने सरकारने विरोधीपक्षातील नेत्यांवर ही कारवाई केली आहे. केवळ विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी सरकारने हे षडयंत्र रचले आहे.” असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
नवाब मलिकांचा राजीनामा कधी ?
आता मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळल्यानंतर देखील सरकार मलिकांचा राजीनामा घेत नाही? नवाब मलिक राजीनामा कधी देणार हा प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केला आहे. मुंबईच्या हत्यारांसोबत व्यवहार करणारे नेते अजूनही मंत्रीपदावर आहे, ही अतिशय शरमेची बाब आहे, असे देखील विरोधी पक्षाने म्हटले आहे.
एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे, त्यामुळे पुढे काय होते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
