गेल्या काही काळापासून आपल्या देशात सूडो सेक्युलर वर्गाने एक विशेष पद्धतीचे नॅरेटिव्ह मुद्दाम सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्व नॅरेटिव्ह्सचे खच्चीकरण करणारा सिनेमा आता भारतात आला आहे, तो म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’. हा सिनेमा बघितल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ते म्हणाले कि, “मी हा चित्रपट पाहून स्तब्ध आहे आणि नि:शब्द देखील” देशातील प्रत्येका व्यक्तिने हा सिनेमा बघितला पाहिजे. खासकरून देशातील सूडो सेक्युलर वर्गाने, कारण गेल्या काही काळापासून या वर्गाने एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या सिनेमाच्या माध्यमातून सत्य बाहेर आले आहे.” अशा भावना व्यक्त करत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते पुढे हे ही म्हणाले, “या सूडो सेक्युलर वर्गाने इतिहास डिलीट करण्याचा प्रयत्न केला होता, तो इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आला आहे. असे म्हणतात ज्याला इतिहास नसतो, त्याला वर्तमान तर असतं मात्र भविष्य नसतं. त्यामुळे हा इतिहास आपल्याला जाणून घ्यावाच लागेल. काही राज्यकर्त्यांने जाणून बूझून आपल्या इतिहासातील हे पान डिलीट केलं होतं. ते पुन्हा एकदा आमच्या समोर आणण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून झालं आहे.”
हा सिनेमा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही :
हा सिनेमा कुठल्याही जाती किंवा धर्माच्या विरोधात नसून भारतातच राहून भारत विरोधी नॅरेटिव्ह तयार करण्याऱ्या लोकांविरुद्ध आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा चित्रपट आवर्जून बघायला हवा.” असेही ते यावेळी म्हणाले.
मी स्वत: आंदोलनात सहभागी होतो, मी स्थिती आपल्या डोळ्यांनी बघितली आहे :
यावेळेला आपल्या कॉलेज जीवनातील अनुभव सांगताना ते म्हणाले कि, “मी स्वत: विद्यार्थी परिषदेत असताना १९८९ ला काश्मीरला जाऊन आलोय, त्यावेळी मी कॅम्प्सला भेट दिली आहे, आणि खरी परिस्थिती अनुभवली आहे. पण त्याहीपेक्षा जी परिस्थिती या ठिकाणी मांडण्यात आली आहे, ती अतिशय भयावह आहे.”
पंतप्रधान मोदींनी १३० कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले :
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानीन कि त्यांनी या भारतीय जनतेचे, आमचे स्वप्न पूर्ण करत काश्मीर मधून कलम ३७० रद्द केली. “जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है” असं काश्मीर आम्हाला त्यांनी दिलं. कलम ३७० आणि ३५अ जरका आता असले असते तर काश्मीरची हीच परिस्थिती असती जी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या देशात राहून देशातील लोकांना आपल्याच देशाविरोधात भडकवणाऱ्या आणि तयार करणाऱ्या लोकांसाठी अजूनही जागा असती जर ३७० रद्द झाले नसते. तो नरेटिव्ह आता संपलाय. आणि हे सगळं समोर आणल्याबद्दल मी संपूर्ण कश्मीर फाईल्स टीमचं विवेक अग्निहोत्रींचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो.
या एका चित्रपटाने इतिहास रचला आहे. आता पर्यंत या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २०० कोटींच्या पार गेले आहे. आणि हा सिनेमा येत्या अनेक दशकांपर्यंत डोळ्यातील अंजन बनून सत्य समोर आणल्याबद्दल प्रसिद्ध असेल.
