कोरोनाने लोक मरत होते, तेव्हा सरकारने केली २४ महीन्यांत ३८ संपत्तींची खरेदी…!



महाराष्ट्र राज्याचा नंबर कोरोनाच्या रुग्णांमध्ये सगळ्यात पहिला होता. अगदी तीनही लाटा येऊन गेल्या तेव्हा प्रत्येक लाटेत महाराष्ट्र नंबर १ ला होता. असे असताना या काळात महाराष्ट्र सरकारने किती संपत्ती खरेदी केली याचा लेखा जोखा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, “कोरोना काळात सरकारने ३९ कोटी रुपयांच्या टॅबची खरेदी केली, १० वीच्या मुलांसाठी वर्ष संपताना हे टॅब का विकत घेण्यात आले? याचा त्यांना काय उपयोग झाला असता?” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.



टेंडर पे टेंडर नो सरेंडर :


यावेळी बोलताना सरकारवर टोला हाणत ते म्हणाले कि, “टेंडर पे टेंडर आणि नो सरेंडर अशी सरकारची अवस्था झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे धाड पडते आणि तब्बल ३०० कोटींची बेनामी संपत्ती सापडते. त्याचा पूर्ण रिकॉर्ड सापडला आहे. एकीकडे लोक कोरोनाने मरत होते, आणि दुसरीकडे प्रॉपर्ट्या घेणं सुरु होतं. २४ महिन्यात ३८ संपत्ती घेण्यात आल्या. हे अतिशय भयंकर आहे.”

एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे कच्चे चिट्ठे बाहेर काढले. आणि त्यामुळे विरोधकांमध्ये नाराजी दिसून आली. फडणवीस यांनी काही व्हिडियो आज आपल्या ट्विटर खात्यावरुन पोस्ट केले आहेत. ज्याला महाराष्ट्राच्या जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.