
“ज्या प्रकारे शेतकऱ्यांना, शेतमजूरांना, ओबीसींना सामान्य माणसाला हे सरकार प्रताडित करत आहे, आम्ही विदर्भात १२ तास वीज दिली, आम्ही शेतकऱ्यांना वीज दिली, कधीच वीज कापली नाही, बिल भरलं जात आहे कि नाही, याकडे आम्ही लक्ष दिले नाही, मात्र या सरकारने सावकारी पद्धतीने वीज कापायला सुरुवात केली, आणि आता शेतकऱ्यांना ८ तास देखील वीज मिळत नाही. असे हे सराकर आहे, बंधु भगिनींनो जागे व्हा ही संघर्षाची वेळ आहे.” असे म्हणत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ब्रम्हपुरी येथील जनतेला संबोधित केले. गढचिरोली दिशेने जाताना ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही :
“आमच्या सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांना धानाचा बोनस दिला, या सरकारने केवळ तो बोनस पहिल्यांदा दिला आणि त्यानंतर त्यांनी काहीच केले नाही. आम्ही बोनस देऊ देऊ म्हणत धानाच्या शेतकऱ्यांना या सरकारने टांगणीला लावले. शेतकऱ्याला आज पैसा मिळतोय तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या कृषि सन्मान योजनेंतर्गत ६००० रुपये मिळताएत, मात्र या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले?” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
“खऱ्या अर्थाने ब्रम्हपुरी तालुक्यातील एका गावात कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आज पर्यंत आपला चंद्रपुर आणि गढटिरोली जिल्हा शेतकरी आत्महत्येपासून लांब होता, मात्र या सरकारने शेतकऱ्यांना इतके प्रताडित केले कि, आता हे आत्महत्येचे लोढ आपल्यापर्यंत दोखील पोहोचले.” असे म्हणत फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्येसारख्या अतिशय महत्वाच्या मुद्यात हात घालत सरकारला टोला हाणला.
सामान्य माणसाच्या तिजोरीवर डल्ला मारून मंत्र्यांनी आपली तिजोरी भरली :
“तुमच्यासाठी आम्ही संघर्ष सुरु केला आहे. हे सरकार गेले दोन वर्ष विधानसभेचे अधिवेशन घेऊ दिले नाही. मात्र यावर्षी आम्ही ते अधिवेशन घ्यायला भाग पाडले. मी सरकारला सळो कि पळो करून सोडले या अधिवेशनात. एकही मंत्री समोर उभा रहायला तयार नव्हता, मुख्यमंत्री तर कुठे होते तर माहितीच नाही. आम्ही रोज भ्रष्टाचाराचे आरोप करत पुरावे देत होते, मात्र यांच्या कडे उत्तर नव्हते कारण सामान्य माणसाच्या तिजोरीवर डल्ला मारून हे मंत्री आपली तिजोरी भरत होते.”
सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला आपल्याला पाडायचे आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या कडे विनंती करायला आलो आहोत. असेही ते यावेळी म्हणाले.
