अखेर एसटी संपाचा तिढा सुटला…!


जे सरकारला शक्य झाले नाही ते अखेर आज उच्चन्यायालयाने करून दाखवले.

गेल्या अनेक दिवसांपासून रखडला गेलेला एसडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा आज अखेर सुटला. हा तिढा उच्च न्यायालयाने सोडवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पासून कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे आता एसटी कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीवेतन, ग्रॅच्युटी आदि सुविधा देण्याचे आदेश एसटी मंडळाला देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची शान एसटी आता पुन्हा एकदा रस्त्यावर धावणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील जल्लोषाचे वातावरण आहे.

उच्च न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आपला जल्लोष व्यक्त केला. यावेळी सर्वच एसटी कर्मचापी भावुक झाले होते. उच्चन्यायालयाच्या निर्णयानंतर संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील एड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, वारंवार सूचना करूनही संप सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.  या कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं. त्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी मिळावी, असं हायकोर्टाने सांगितल्याचं एड. सदावर्ते यांनी सांगितलं.


राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून संपावर गेले होते. महामंडळाने वारंवार सूचना करूनही कामावर हजर न राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. यादरम्यान ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, ते मागे घेणार नाही, अशी भूमिका महामंडळाने घेतली. पण हे गुन्हे मागे घेण्याबद्दलही आदेश उच्चन्यायलयाने दिला.

अखेर राज्यातील अतिशय मोठ्या समस्येचा तिढा आता सुटला आहे. आणि एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसणार आहे.