
मुंबईत काल हुनर हाट अशा एका हस्तकला आणि व्यापार मोळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, “हुनर हाट हा केंद्राच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे हस्तकला उद्योग आणि व्यापरासाठी सुरु करण्यात आलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे. मुख्तार अब्बास नकवी यांच्या नेतृत्वाखाली हा ‘हुनर हाट’ भरवण्यात आलेला आहे. इथे देशातील सर्व भागांमधून हस्तकला, शिल्पकलेचे उद्योजक, व्यापारी आणि कारीगर आलेले आहेत. त्यामुळे मुंबई येथील जनतेने हुनर हाटला अवश्य भेट द्यावी.
“भारताच्या प्रतिभेचे दर्श घडवणाऱ्या ‘हुनर हाट’ मध्ये कला आणि संस्कृतिचे दर्शन घडले आहे. देशातील ‘हुनर’ ला कलेला एका मार्केटप्लेसची आवश्यकता होती, ज्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत ती कला पोहोचावी. या कल्पनेतूनच ‘हुनर हाट’चा जन्म झाला. यापूर्वीही दोनदा हुनर हाट येथे येण्याची संधी मला मिळाली. देशातील कोपऱ्या कोपऱ्यातून आपली कला, करीगरी घेऊन कलाकार येथे आले आहेत. हे पाहून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे कि आपल्या देशात इतकी प्रतिभा असणारे लोक आहेत. हे सर्व हीरे आहेत आणि त्यांना तराशून जगासमोर आणण्याचे काम मुख्तार अब्बास नकवी यांनी केले आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
“हे ४०वे हुनर हाट आहे. आतापर्यंत देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘हुनर हाट’ भरवण्यात आला होता. या वर्षी हे हुनर हाट मुंबई येथे भरवण्यात आले आहे. भारताची ही प्रतिभा प्राचीन आहे. आपल्या देशात असे लोखंड प्राचीनकाळी निर्माण झाले आहे जे जंगरोधी आहे. ही प्रतिभा हळू हळू लुप्त होत चालली होती. केवळ काही गावांपर्यंत सीमित होती. मात्र या प्रतिभेला मार्केटप्लेस उपलब्ध करून देत, या सर्व कारीगरांची कला जगासमोर आणण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्तार अब्बास नकवी यांनी केले, आणि त्याचे परिणाम आज आपण आपल्या समोर बघत आहोत.” असे म्हणत फडणवीस यांनी नकवी यांची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली.
या ‘हुनर हाट’ मुळे ९ लाखआंहून अधिक लोकांना केवळ रोजगारच नाही मिळाला तर त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ज्या प्रकारे मोदी जी म्हणतात, “कि जर आपण स्वदेशी वस्तु खरेदी करण्यास आज प्रारंभ केला तर पुढच्या २५ वर्षात या देशात कुणीही बेरोजगार राहणार नाही. आणि याची छोटीसी झलक या हुनर हाट मध्ये बघायला मिळाली.
“आपल्याला असा गैरसमज असतो कि, केवळ फॅक्ट्री मध्ये बनणाऱ्या वस्तुंचीच गुणवत्ता चांगली असते, मात्र हाताने बनवलेल्या वस्तुंची गुणवत्ता अनेकदा फॅक्ट्रीपेक्षाही उत्तम असते. ही कला खूप प्राचीन आहे, आणि ती केवळ हे शिल्पकारच जाणतात. त्यामुळे आपण या कलाकारांकडून अधिकाधिक वस्तुंची खरेदी केली पाहिजे.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हुनर हाटाचे हे ४०वे संस्करण आहे आणि १६ ते २६ एप्रिल या काळात ते मुंबई येखील बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्स येथे एमएमआरडीए ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. ३१ हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून सुमारे १००० कारीगर आणि शिल्पकारांनी या हुनर हाट मध्ये भाग घेतला आहे. आणि एकूण ४०० हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
ही संकल्पना देशातील कलाकारांना, कारीगर आणि शिल्पकारांना आत्मनिर्भर करण्यासाठी अतिशय बलशाली ठलेर, अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.
