“ज्या प्रमाणे इंग्रजांचे राज्य चालायचे, त्याच प्रमाणे अमरावती पोलिसांचा कारभार सुुरु आहे.” असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. अमरावती येथे भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षांवर पोलिसांद्वारे अमानवीय कार्यवाही करण्यात आली त्याविषयी आपले मत मांडत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते.
“अमरावती येथे पोलिस ज्या पद्धतीने लांगूलचालन करत आहे, ते अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे दोन समाज एकमेकांसमोर येत आहेत. अमरावती येथे सरकार आणि पोलिसांची जी प्रतिक्रिया येते आहे, आणि ज्या पद्धतीने केवळ हिंदू समाजाला टारगेट करण्यात येत आहे, हे अतिशय चुकीचे आहे. पोलिसांनी जात धर्म न बघता न्याय केला पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाहीये.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

पोल खोल यात्रेवर झालेल्या हल्ल्याविषयी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले कि, “ज्यांची पोल खोल होते आहे, ते अस्वस्थ आहेत, अस्वस्थ होऊन ते आमच्या रथावर हल्ले करताएत, पोलिसांनी जर त्यांना संरक्षण दिले तर आम्ही पोलिसांची ही पोलखोल केल्या शिवाय राहणार नाही.”
एकूणच सरकारचा भ्रष्टाचार समोर येत आहे, त्यामध्ये पोलिसांची देखील मिली भगत असल्याचे समोर येत आहे, मात्र आता पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
