गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजाकारणात ‘राणा’ दांपत्याचे नाव खूप चर्चेत आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पति आमदार रवी राणा यांना मुंबई येथे घुसु देणार नाही असा निर्धार शिवसेनेने केला होता, मात्र शिवसेनेवर गनीमीकावा करत राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले आहे. गेलाय काही दिवसांपासून हनुमान चालीसा पठणावरुन राज्यात वाद सुरु आहे. राणा दांपत्याने दाहीर केले होते कि मातोश्री समोर ते हनुमान चालीसाचे पठण करणार, याचा विरोध शिवसेनेकडून करण्यात आला होता. राणा दांपत्य मुंबईत दाखल नाही झाले पाहिजे, यासाठी शिवसेनेचा प्रयत्न होता, मात्र सगळ्यांना चकमा देत राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले आहे.

नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये राणा दाम्पत्याचं बुकिंग :
दरम्यान नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आज आणि उद्याचं बुकिंग केलं आहे. परंतु अद्याप राणा दाम्पत्य पोहोचलेलं नसल्याचं गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने सांगितलं. नंदगिरी गेस्ट हाऊसबाहेर शिवसैनिक हजर असून कोणत्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला मातोश्रीपर्यंत पोहोचू देणार नाही किंवा हनुमान चालीसाचं पठण करु देणार नाही, असं शिवसैनिकांनी ठणकावलं.
रवि राणा यांचे वक्तव्य ज्याची मोठ्या प्रमाणात झाली चर्चा :
आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केले होते कि, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावरचे संकट वाढले आहे. महाराष्ट्रात इतक्या समस्या असून सुद्धा मुख्यमंत्री घराबाहेर निघत नाही. त्यामुळे या महाराष्ट्राला संकटापासून बाहेर काढण्यासाठी आम्ही हनुमानाला हनुमान चालीसा म्हणत गाऱ्हाणं घालणार आहोत. आम्ही मोठ्या श्रद्धेने अमरावती ते मुंबई अशी वारी करणार आहोत आणि मातोश्री समोर आम्ही हनुमान चालीसेचं पठण करणार आहोत, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मोठ्या मनाने साथ द्यावी.” असे ते म्हणाले असल्याने शिवसेना सतर्क झाली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत राणा दांपत्याला मताोश्री पर्यंत पोहोचू देणार नाहीत, असा निर्धार शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे.
त्यामुळे आता पुढे काय होणार ? राणा दांपत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करू शकेल का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
