सरकारने नवनीत राणा यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचे नाकारले…! नेमकं खरं काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात ‘हनुमान चालीसा’ या वारून खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरु आहे. यकासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अर्थात मातोश्री समोर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय केला होता. मात्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर तुरुंगात नवनीत राणा यांना हीन वागणूक देण्यात आली. त्यांना त्यांच्या जातीवरुन वाईट बोलण्यात आले, आणि त्यांना प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. त्यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत गदारोळ केला, मात्र या सगळ्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘नवनीत राणा यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची हीन वागणून झालेली नाही,” असे म्हणत त्यांचे आरोप फेटाळले आहेत.



राजद्रोहाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत राणा यांना एक स्त्री असून देखील वॉशरूम वापरण्याची परवानगी देण्यात आली. त्यांना प्यायला पाणी देण्यात आले नाही, त्यांना दलित असण्याची आठवण करून देण्यात आली. असे आरोप नवनीत राणा यांनी केले होते. मात्र हे सर्व आरोप फेटाळत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असे काही झालेच नाही असे म्हटले आहे, त्यावरुन आता विरोधी पक्ष आक्रामक झाला आहे.



फडणवीस यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले कि, “ हनुमान चालीसा म्हणण्यावरुन जर महाराष्ट्र राज्यात राजद्रोहाचा खटला लावण्यात येणार असेल, तर आमच्या सगळ्यांवर हा खटला लावा. असे म्हणत त्यांनी भर पत्रकार परिषदेत जोर जोरात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. तसेच हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही म्हणयाची तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

एकूणच महाराष्ट्र राज्यात हनुमान चालीसा वरुन राजकारण व्हावं, त्यासाठी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अटक झालेल्या व्यक्तिला जातीवरुन हिणवण्यात यावं, आणि असं काही झालंच नाही, असं सरकारने म्हणावं, हे किती दुर्दैवी आहे, नाही का? असो, पुढे काय होतं, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.