
या सरकारने ओबीसी आरक्षणाची कत्तल केली आहे. हे सरकार हत्यारे सरकार आहे. असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप कार्यसमितीची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत आहे. आज त्या भाषणातील काही महत्वाची वक्तव्ये फडणवीस यांनी आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केली त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे हे भाषण व्हायरल होत आहे.
ओबीसी आरक्षणाविषयी सातत्याने आपला संघर्ष सुरु आहे. 13.12.2019 ला या सरकारला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितली मात्र 4 मार्च 2021 पर्यंत त्यांनी काहीच केले नाही. केवळ टाईमपास केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रिपोर्ट मध्ये लिहीले आहे, कि सरकारला काही करायचेच नाही, तर आम्ही तारीख देऊन तरी काय करु? असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. आणि त्यानंतरही अद्यापही या सरकारने या विषयावर काहीच केले नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका मध्यप्रदेशाला देखील बसला, आणि तसे झाल्यानंतर मी स्वत: मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याची बोललो. त्यांना एक नोट तयार करून दिली, सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे, इम्पिरिकल डेटा कसा तयार करायचा ? ट्रिपल टेस्ट कशी होईल. मध्यप्रदेशाने लगेच त्यावर हालचाल केली, कमीशन तयार केले आणि मध्यप्रदेशाचा हा प्रश्न सुटला. मी हीच गोष्ट या सरकारला देखील सांगितली, मात्र त्यांनी काहीच केले नाही. सर्वोच्च न्यायालयाला या सरकारने जो रिपोर्ट दिला, त्यावर सही नाही, तारीख नाही आणि त्यामुळे तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
या विषयी मी जेंव्हा शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोललो त्यावेळी ते म्हणाले “देवेंद्र जी तुमच्याशी बोलणे झाल्यावर मी एकही दिवस थांबलो नाही” त्यांची योग्य पावले उचलली म्हणून आज मध्यप्रदेशात ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. मात्र माहाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार काहीच करत नाही.
असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
