
काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणार बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान यांचे पुत्र आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मुंबईजवळ एका क्रूजवर सुरु असलेल्या पार्टीत ड्रग्सचा वापर होत असल्याते समोर आले आणि त्यावेळी मारण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खान आणि त्याच्या सह काही लोकांना अटक करण्यात आली होती. मात्र आज न्यायालयाने या विषयी निर्णय देत आर्यन खानसह 6 जणांना क्लीनचिट दिली आहे. आणि केवळ 14 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीचं आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलं. या प्रकरणामधील 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यन खानसह सहा जणांना या प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नाहीत. केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी आर्यनसह 20 जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळाला आहे कारण त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 10 खंडाचे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेलं आहे. 6000 पानांचे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकूणच या प्रकरणावरुन राज्यात गदारोळ झाला होता आणि किंग खान विरोधात एक जनमत तयार झालं होतं. मात्र आता सबळ पुराव्यांअभावी आर्यन खानला सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
