भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला एक आदिवासी महिला राष्ट्रपती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लोकशाहीचा सन्मान केला आहे. मी नूतन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. विधान परिषदेत आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रती मुर्मू यांच्यासाठी अभिनंदनाचे भाषण केले त्यावेळी ते बोलत होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला असे संविधान दिले, ज्यामुळे एक सामान्य आदिवासी महिला या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या. त्यांची निवड हा भारतीय लोकशाहीचा गौरव आहे. असेही ते यावेळी म्हणाले. आज राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. त्यावेळी फडणवीस यांनी विधान परिषदेत आपले विचार मांडले आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले.
यावेळचं पावसाळी अधिवेशन अतिशय महत्वाचे ठरणार आहे. नुकतेच माहाराष्ट्रात मोठ्या नाट्यपूर्ण परिस्थितीत सत्ता परिवर्तन झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतील काही नेते हे विरोधीपक्षात बसणार आहेत. त्यामुळे या संदर्भात पुढे काय होते, हे बघणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे.
या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार अससल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य माणसासाठी या अधिवेशनात काय निर्णय घेण्यात येतील याकडेच सगळ्यांचा डोळा लागून आहे.
