सायबर गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील. राज्यात सर्व प्रकारचे इंटेलिजंस युनिट्स आहेत मात्र सायबरचे नाहीत. सायबर इंटिलिजन्स युनिट राज्य सरकार निश्चितपणे तयार करेल ! अशी घोषणा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यात साबर गुन्ह्यांमधअये खूप वाढ झाली आहे. फसवणूक महाराष्ट्रातील माणसासोबत होते, मात्र फसवणूक करणारा हा कधी कधी राज्याबाहेरचा असतो किंवा दुसऱ्या देशातीलही असतो. त्यामुळे याविषयी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

आपल्या राज्यात मागे पोलिसांनी चांगली कारवाई केली होती, आणि एक छोटे युनिटही तयार करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात लोनच्या चायनीज एप्स बाजारात आहेत. हे नेपाळ येथून चालवले जाते, आणि त्यामाध्यमातून भारतातील भोळ्या लोकांना फसवण्यात येतं. आपल्या सायबरसेलने अशा अनेक वॅलेट्स आणि एप्स वर कारवाई केली आहे. हे विभाग अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. असेही ते यावेळी म्हणाले.
सायबर सिक्योरिटी युनिट्सना मजबूत करण्यासाठी मोठ्या सायबर लॅब्स आणि फॉरेंसिक लॅब्स सुरु करण्यात येत आहेत. आणि यासाठी आपण सर्व नवीन उपकरणे महाराष्ट्रात आणली आहेत. आपल्याला बाहेरील काही देशांप्रमाणे आपल्या येथील मोठ्या कंपन्यांना आउटसोर्स देखील करावे लागेल. मोठ्या प्रमाणात याठिकाणी जनजागृतिची आवश्यकता आहे. कारण भारतात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामुळे या संदर्भात मोठे कँपेन तयार करणे आवश्यक आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. असेही फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने या विषयी मोठी व्यवस्था उभी केली आहे, त्यासोबत आपल्या राज्याला आणखी चांगल्या पद्धतीने कसे जोडण्यात येईल यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्य करू. असे देखील ते यावेळी म्हणाले.
एकूणच सायबर गुन्हे वाढले आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या देखील वाढल्या आहेत. त्यामुळे यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि अशा सायबर गुन्ह्यांविरोधात राज्याची भूमिका कशी असेल, कुठली पावले उचलण्यात येतील हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
